Audio Book

जगातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय नोबेल पीस पुरस्कारासाठी नामांकित तीन तपापेक्षा जास्त समाजसेवेची तपश्चर्या करणार्‍या, बेटी बचाओ चळवळीच्या आद्यप्रवर्तक, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व! सामाजिक शांती प्रस्थापनेसाठी पुढाकार. . .असणाऱ्या डॉ सुधा कांकरिया लिखित पुस्तक 

स्री जन्माचे स्वागत करा 

1 परिचय_ स्री जन्माचे स्वागत करा पुस्तक
2 शुभेच्छा संदेश
3 मनोगत
4  गौरव निवेदन , अनुक्रमणिका
5 खुडू नको कळी आई - नाटिका
6 लक्ष्मी येई घरा - नाटिका
7 कलम ११ - नाटीका 
8 औंदा लग्नाचा इचार नाय - नाटीका 
9 सातच्या आत घरात - नाटीका 
10 स्वच्छतेचा मंत्र -  नाटीका 
11  बेटी नहीं तो बहू कहां से लाओगे -  नाटीका 
12 मुझे दीदी चाहिए - नाटीका
13 बेटी को बचाना है - नाटीका
14 कायदा- लेख- कृती कार्यक्रम   भाग १   
15 कायदा- लेख- कृती कार्यक्रम   भाग 2
16 कविता 1-4
17 कविता 5-9
18 कविता 10-12
19 कविता 11-14
20 कविता 15-20
21 ठराव
22 वृत्तपत्र कात्रण भाग १
23 वृत्तपत्र कात्रण भाग २
24  वृत्तपत्र कात्रण भाग ३
25 घोषवाक्य
Save Girl Child Book - स्री जन्माचे स्वागत करा पुस्तक

             ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’ या चळवळीच्या माध्यमातून त्या खेड्यापाड्यात, शाळा-कॉलेजांमध्ये बैठका, कार्यशाळा घेऊन जे लोकशिक्षण आणि लोक जागृतीचे कार्य करीत आहेत हे अत्यंत महत्वाचे आहे. 11 कलमी कृती कार्यक्रमाची निर्मीती करून त्या समाजमनात रूजवत आहेत. पुरुष प्रधान संस्कृतीने महिलांना नेहमी दुय्यम स्थानावर ठेवले आहे, तरीही जिद्दीने, तळमळीने त्यांनी जे काम केले आहे, ते कौतुकास्पद आहे. 1985 साली देशात पहिल्यांदा डॉ. सुधाताईंनी सुरू केलेली ही चळवळ आता देशव्यापी झाली आहे. स्त्रीभ्रुणहत्या थांबविण्यासाठी हे पुस्तक खर्‍या अर्थाने मार्ग दाखवेल असा विश्वास वाटतो.

                                                                                              - अण्णा हजारे

                सुधाताईंच्या समग्र मानव कल्याणकारी कार्याची आता चळवळच बनली आहे. सर्व विचारसुत्र आणि कृती कार्यक्रमासाठी सुमारे 30 लाख लोक या चळवळीत सामील झाल्याचे चित्र आश्वासक आहे. यातूनच संस्कृतीचे सुंदर चित्र व चरित्र आकाराला येईल ही अपेक्षा! अस्सल जीवनानुभवाच्या बळावरील सुलभ - सोप्या भाषेतील नाटय आणि कविता अनेक पैलूंना जन्म देतात. या सर्व नाटिकांचे शेकडो प्रयोग यशस्वी होतात व सकारात्मक परिणाम करून जातात. सुधाताईंचे स्त्रित्व प्रगल्भ व चिंतनशील असून समग्र मानवतेला पोटात घेणारे आहे. अशाच सत्यनिष्ठ विवेकी व विधायक प्रवृत्तीच्या लेखनाची समाज-संस्कृतीला गरज आहे. कारण भारतीय संस्कृतीसह विश्व संस्कृती मधील मानवता सर्वार्थाने सुखी करण्याचे आव्हान समस्त लेखक-कलावंत-विचारवंताना पेलायचे आहे. सुधाताई कांकरियांनी एक स्त्री, डॉक्टर व लेखक म्हणून आपले मानवतानिष्ठ कर्तव्य चोख बजावले आहे. 

                                                                                                - डॉ. श्रीपाल सबनीस